Ad will apear here
Next
तणाव प्रबंधन
स्पर्धेच्या जीवनात ताण येणे, ही बाब सहज घेतली जाते; पण ताण म्हणजे नेमके काय, हे सांगताना ‘परिस्थितीशी जुळवून घेताना येणाऱ्या अडचणी म्हणजे ताण,’ अशी व्याख्या प्रा. डॉ. मनीषा मुलकलवार यांनी ‘तणाव प्रबंधन’मधून केली आहे. तणावाचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य कसे विकसित करायचे, याचे मार्गदर्शन या पुस्तकातून केले आहे.

तणावाची संकल्पना, प्रकार, तणावग्रस्त व्यक्तींची लक्षणे, तणावाबाबत गैरसमज, भारतातील परिस्थिती, तणावकारक घटक, त्याचे वर्गीकरण, तणावाची कारणे, तणावाने शरीरामध्ये होणारे बदल, तणाव व मन, तणाव व भावना, तणाव व आजार, याबाबतही सविस्तर माहिती दिली आहे. तणाव प्रबंधन संकल्पना, त्यातील अडथळे, तणाव प्रबंधातील पायऱ्या, सूचना, त्यासाठी दशसूत्री सांगितले आहे.

तणाव प्रबंधानात्मक जीवनशैलीसाठी जगताना सकारात्मक दृष्टीकोन, नातेसंबंधातील, स्वास्थ यांचे महत्त्व, आहार-व्यायामाची कशी गरज भासते, हे स्पष्ट केले आहे. पुस्तकातील प्रत्येक मुद्दा सोप्या भाषेत समजावून देताना उदाहरणांचा वापरही केला आहे.           

पुस्तक : तणाव प्रबंधन
लेखक : डॉ. मनीषा मुलकलवार
प्रकाशक : शब्दयात्रा प्रकाशन
पाने : १९०
किंमत : २४० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZOJBY
Similar Posts
हीलिंग : एक प्रकाशवाट स्वास्थ्य राखण्यासाठी मन व शरीर दोन्ही तंदुरुस्त असावे लागते. आपल्याला होणारे बहुतांश रोग मनाचे स्वास्थ्य हरविल्यानेच होतात. म्हणूनच मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी हीलिंग ही उपचारपद्धती उपयुक्त ठरते, असे विचार मांडून वृषाली लेले यांनी ‘हीलिंग : एक प्रकाशवाट’ या उपचारपद्धतीचे काम कसे
एक संन्यासी शिवाजी महाराजांचे चरित्र वेगवेगळ्या अंगाने अभ्यासता येते. दर वेळी त्यातून काही नवे होती लागते. निष्काम कर्मयोग हाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे. याची ओळख प्रा. नामदेवराव जाधव यांनी या पुस्तकातून करून दिली आहे. लाखो लोकांचा संसार करणारे ते संन्यासी होते, असे जाधव सांगतात. महाराजांनी संपत्ती
संपूर्ण फोटोशॉप CS-5 कॉम्प्युटरच्या साहाय्याने फोटोसंबंधी अनेक गोष्टी करता येतात. त्यासाठी प्रोग्रॅम लागतो. फोटोशॉप हा फोटोसंबंधीचा एक महत्त्वाचा प्रोग्रॅम आहे. फोटोंचे स्कॅनिंग, एडिटिंग, कोलाज, वेगवेगळ्या प्रकारची फॅन्सी अक्षरे अशा कितीतरी गोष्टी फोटोशॉपच्या मदतीने करता येतात. नरेंद्र आठवले आणि सुजाता आठवले यांनी या पुस्तकात या प्रोग्रॅमविषयी साद्यंत माहिती दिली आहे
संपूर्ण कोरल ड्रॉ काँप्युटरवरील कोरल ड्रॉ या प्रोग्रॅमचा साह्याने कोणत्याही प्रकारचे डिझाइन अथवा ड्रॉइंग करता येते. त्यामुळे हा प्रोग्रॅम प्रामुख्याने मुद्रक, चित्रकार, कलाकार वेबडिझायनर यांच्यासाठी उपयुक्त आहे. या पुस्तकात नरेंद्र आठवले आणि सुजाता आठवले यांनी कोरल ड्रॉ या विषयीची इत्यंभूत माहिती दिली आहे. प्राथमिक माहिती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language